Weekly Horoscope 20 To 26 January 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी नवीन संधी घेऊन येईल. या आठवड्यात मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील, किंवा इच्छित यश मिळू लागेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. व्यवसाय करत असाल तर व्यवसायात प्रगती होताना दिसेल. या आठवड्यात काही कामासाठी तुमचा सन्मान होईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांमध्ये आश्चर्यकारक ऊर्जा आणि उत्साह दिसेल. कुटुंबाच्या हितासाठी घेतलेले निर्णय तुम्हाला यश मिळवून देतील. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. आपली दैनंदिन दिनचर्या आणि आहाराची काळजी घ्या.
मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल, कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. काही महत्त्वाच्या कामात चढ-उतार जाणवतील. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कामाबद्दल नकारात्मक विचार करू नका. प्रेमसंबंधात अहंकार दाखवणं टाळा.
नवीन आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी लाभाचा ठरेल. या आठवड्यात करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. नोकरी-व्यवसायात तुम्हाला इच्छित लाभ होईल. या आठवड्यात तुम्ही वाहन खरेदी करू शकता. मुलांशी संबंधित कोणतीही समस्या सोडवता येईल. जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवू शकाल. तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या आयुष्यात कोणी व्यक्ती प्रवेश करू शकते.
सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपल्या आरोग्याची आणि नातेसंबंधांची चांगली काळजी घ्यावी. या आठवड्यात तुमचे एखाद्याशी वाद होऊ शकतात. आपला आहार आणि दैनंदिन दिनचर्या योग्य ठेवा. तुमचं लव्ह लाईफॉ सुधारण्यासाठी जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. व्यवसायात तुम्हाला चढ-उतारांना सामोरं जावं लागू शकतं.
कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणतेही काम अर्धवट सोडू नये. कोणतेही नियम आणि कायदे मोडणं टाळा. पैशाचा योग्य वापर करा. अनावश्यक खर्च करू नका. आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ रहा. कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा, नाहीतर संबंध बिघडू शकतात. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.