Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
आजपासून सुरू होणारा नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी शुभ फळ घेऊन येणार आहे. करिअर आणि व्यवसायासाठी हा आठवडा उत्तम राहील. या आठवड्यात लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यवसाय विस्ताराचे नियोजन या आठवड्यात यशस्वी होईल. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खूप शुभ राहील. तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला अपेक्षित नफा मिळू शकेल. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात. प्रेम जीवनात अनुकूलता राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र राहील. कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे तुम्ही चिंतेत राहू शकता. तुम्हाला व्यवसायात मंदीचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक खर्चापासून लांब राहा. प्रेमसंबंधात अनावश्यक शो ऑफ टाळा.
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र असू शकतो. या आठवड्यात तुम्ही फिरायला जाऊ शकता. कोणतंही काम करताना घाई करू नका. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात भाग्याची साथ मिळेल. करिअर आणि बिझनेसमध्ये कोणत्याही कामात घाई करू नका. व्यवसायात तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या भावनांशी खेळू नका. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं.
कन्या राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात कठीण जाऊ शकते. तुमच्या वस्तूंची काळजी घ्या, चोरी होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल निराश होऊ शकता. काही महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही मोठी रक्कम खर्च करू शकता.