Weekly Horoscope 20 To 26 January 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ आणि लाभदायी ठरेल. या काळाच तुम्हाला करिअर आणि व्यवसायात यश मिळेल. तुमचा मान-सन्मान वाढेल. या आठवड्यात तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदारासोबत प्रेम वाढवण्याची संधी मिळू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या मदतीने तुमचं एखादं काम पूर्ण होईल. तुम्हाला व्यवसायात मोठी रक्कम मिळू शकते. महिलांना या आठवड्यात धार्मिक कार्यात वेळ घालवता येईल. लव्ह लाईफमध्ये शांती राहील.
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुम्ही काही कामासाठी प्रवास करू शकता. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवू शकाल. या आठवड्यात तुमची धार्मिक कार्यात रुची वाढू शकते. तुमच्या प्रियकराकडून तुम्हाला एखादं सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं.
मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात सर्व वादांपासून दूर राहावं लागेल. या आठवड्यात तुमच्यावर कामाचा जास्त ताण येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या कामात जास्त वेळ द्यावा लागेल. वीकेंडला सावध राहा, तुमच्या जोडीदारासोबत तुमचे काही विषयांवरुन वाद होऊ शकतात. प्रेमसंबंधात विचारपूर्वक पाऊल टाका.
कुंभ राशीच्या लोकांना या आठवड्यात आपली कामं पूर्ण करण्यासाठी घाई करावी लागेल. व्यावसायिक भागीदारांसोबत सुरू असलेले मतभेद दूर होतील. या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. व्यवसायाच्या विस्ताराची योजना असेल तर त्यात यश मिळेल.
मीन राशीचे लोक या आठवड्यात एखाद्या कामासाठी प्रवास करू शकतात. तुम्हाला परदेशात जाण्याचीही संधी मिळेल. उत्पन्नाचे वेगळे स्रोत निर्माण होतील. नोकरीत पदोन्नतीचा फायदा होऊ शकतो. मुलांशी संबंधित कोणतीही जबाबदारी तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडू शकता. या काळात आरोग्य उत्तम राहील.