Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी चमत्कारी; अपार धनलाभाचे संकेत, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
मेष रास (Aries Weekly Horoscope) : मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी चांगला आर्थिक लाभ देणारा ठरू शकतो. या काळात तुमचा व्यवसाय वाढेल. कामाच्या ठिकाणीही तुमची सर्व उद्दिष्टं साध्य होतील. या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसप्टेंबरचा हा आठवडा तुमच्या करिअरसाठी खूप चांगला जाणार आहे. तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतात, परंतु तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या गुप्त शत्रूंपासून थोडं सावध राहावं लागेल. तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. विवाहित लोकांच्या नात्यात गोडवा येईल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope) : मिथुन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा आत्मशोधाचा असेल. व्यवसाय किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. परंतु, या आठवड्यात तुम्ही सर्व समस्यांना धैर्याने सामोरे जाल.
या आठवड्यात तुम्ही कोणतंही काम कराल, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअरच्या संदर्भातील निर्णयांवर काम सुरू करू शकता. या आठवड्यात तुम्हाला थकवा आणि निद्रानाश यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope) : कर्क राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा खूप शुभ असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमची स्वप्नं साकार करण्याच्या दिशेने काही पावलं उचलाल. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळेल.
तुम्ही एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात याल आणि तुम्हाला लाभाच्या चांगल्या संधीही मिळतील. जे अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली संधी मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी तुमच्या जोडीदाराशी तुमचे प्रेमसंबंध घट्ट होतील. तुमच्या जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवण्याच्या चांगल्या संधीही तुम्हाला मिळतील.
तूळ रास (Libra Weekly Horoscope) : सप्टेंबरचा दुसरा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. या आठवड्यात नोकरदार आणि व्यावसायिक लोकांना यश मिळू शकतं. तर परदेशात नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. या आठवड्यात कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला फायदा होईल.
तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींचंही पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायानिमित्त तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. परीक्षा स्पर्धेची तयारी करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope) : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा आनंददायी आणि लाभदायक ठरेल. या आठवड्यात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मात्र, या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबतीत थोडं सावध राहावं लागेल.
गुंतवणुकीचा विचार करत असाल तर थोडा विचार करून करा. या आठवड्यात विवाहित लोक केवळ एकमेकांसोबत चांगला वेळ घालवणार नाहीत, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबतही चांगला वेळ घालवतील. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.