Navri Mile Hitlerla : बाप्पाासमोर लीला देणार एजेंवरील प्रेमाची कबुली
‘झी मराठी’ वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत गणेशोत्सवाची धूम सुरु आहे.
लीला तिच्या सुनांना चॅलेंज करते की या वर्षी जहागीरदारांच्या घरी एजे स्वतःच्या हातानी गणपतीची मूर्ती बनवणार आणि त्याची स्थापना होणार.
लीला एजेकडून मूर्ती करुन घेण्यासाठी त्याची मनधरणी करतेय. डेकोरेशन करताना सुनांचं कारस्थान त्यांच्यावरच उलटतं.
त्यांचा एजे लीला मध्ये दुरावा आणण्याचा प्लॅन फ्लॉप होतो आणि दुरावा येण्याजोगी ते दोघे आणखी जवळ येतात.
सुना लीलाला मोदक करायला लावतात, लीला चॅलेंज घेते पण ते चॅलेंज पूर्ण करायला एजे लीलाची मदत करतो.
या सगळ्यात कालिंदीवर चोरीचा आळ लागलाय . यात लीला तिच्या आईबाबांची ठामपणे बाजू घेते.
लीलाच्या मॅच्युरिटीवर खुश होऊन एजे तिला मुंबईचा राजा गणेश गल्ली सार्वजनिक गणपतीची आरती करायला घेऊन जातो.
तिथे दोघांची चुकामुक होते, एजेच्या मनात काळजी तर लीलाच्या मनात प्रेम. ती बाप्पासमोर तिच्या प्रेमाची कबुली देते.
लीलानी, एजेला गणपती मूर्ती बनवण्यासाठी कसं तयार केलं ? लीलाच्या प्रेमाची कबुली ऐकुन एजे काय प्रतिसाद देणार ?
गणपती बाप्पा यांच्या नात्यात प्रेम भरणार बघायला विसरू नका 'नवरी मिळे हिटलरला' सोम - शुक्र १०:०० वा. झी मराठीवर