PHOTO : थोरल्या पवारांचं मुंबईत जावई, नातीसोबत गणेश दर्शन; लालबागचा राजा, चिंचपोकळीच्या चिंतामणी चरणी लीन
लालबागमध्ये देश-विदेशातून भाविकांनी गर्दी केली आहे. एवढंच काय तर, अनेक राजकीय नेतेमंडळींनीही लालबागमधील गणपती मंडळांमध्ये गणरायाच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलालबागमधील प्रसिद्ध मंडळांपैकी एक असलेलं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातही गणरायाच्या दर्शनासाठी अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी आज (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी हजेरी लावली.
लालबाग राजाच्या दर्शनाला थोरल्या पवारांसोबत नात रेवती सुळे आणि जावई सदानंद सुळे देखील उपस्थित होते.
थोरले पवार दुसऱ्यांदा लालबाग राजाच्या चरणी लीन झाले आहेत. यापूर्वी ज्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते.
त्यानंतर अनेक वर्षांनी आज शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
सोबतच, कोरोना काळात रक्तदान शिबिराचं आयोजन लालबागच्या राजाच्या मंडळानं केलं होतं, त्यावेळी देखील शरद पवार आले होते. मात्र, त्यावर्षी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मंडळाच्या वतीनं गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती. फक्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं होतं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यापूर्वी लालबागच्या राजाचं आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं आहे.
त्यासोबतच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहेत.