Weekly Horoscope : येणारे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार, अपार धनलाभाचे संकेत
मेष रास (Aries) : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मेष राशीचे लोक त्यांचा जास्तीत जास्त वेळ शुभ कार्यात आणि मौजमजा करण्यात घालवतील. या काळात लहान प्रवासाचीही शक्यता आहे. हा प्रवास तुमच्या कामाशी संबंधित असू शकतो किंवा कुटुंबासोबतही असू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया आठवड्यात व्यावसायिकांना त्यांच्या मनाप्रमाणे नफा मिळेल. पूर्वी केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घराच्या दुरुस्तीवर किंवा चैनीच्या वस्तूंच्या खरेदीवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini) : मिथुन राशीच्या लोकांचा जुलै महिन्याचा काळ चांगला असेल. तुमची सर्व प्रलंबित कामं या कालावधीत पूर्ण होऊ शकतात. तुमच्या प्रियकरासोबत सुरू असलेले सर्व गैरसमज दूर होतील. नवीन मालमत्ता खरेदी-विक्रीची योजना आखली जाईल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने नवीन संधी मिळतील.
परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. आर्थिक बाबतीत नियोजनपूर्वक काम केल्यास निश्चित लाभ मिळेल. मात्र आठवड्याच्या शेवटी वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कुटुंबियांशी वाद होऊ शकतो.
कर्क रास (Cancer) : या आठवड्याच्या सुरुवातीला कर्क राशीचे लोक दीर्घकाळ अपूर्ण राहिलेल्या सर्व योजना नीट तयार करतील. नोकरीच्या ठिकाणी सर्वांचं पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबात काही शुभ कार्य होण्याचीही शक्यता आहे.
नातेवाईक तुमचं प्रेम प्रकरण स्वीकारतील. जे कोणाच्या तरी प्रेमात आहेत, त्यांच्या नात्याला या आठवड्यात मान्यता मिळू शकते. तथापि, या आठवड्यात कोणालाही पैसे उधार देऊ नका. अन्यथा तुमचे पैसे कुठेतरी अडकू शकतात.
तूळ रास (Libra) : तूळ राशीच्या लोकांसाठी जुलैचा दुसरा आठवडा संपत्तीच्या बाबतीत अनुकूल असणार आहे. तुमच्या मालमत्तेशी संबंधित काही वाद असल्यास ते सोडवले जातील. तुमच्या एखाद्या मैत्रिणीची मदत तुम्हाला मिळेल.
आठवड्याच्या शेवटी अनावश्यक खर्चामुळे तुम्ही थोडे उदास दिसाल. करिअरशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. जे लोक प्रेमसंबंधात आहेत त्यांनी आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केला पाहिजे.
वृश्चिक रास (Scorpio) : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जुलैचा दुसरा आठवडा त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून येतील. नोकरदारांना वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
नोकरदार महिलांसाठी हा काळ शुभ आहे. या राशीचे लोक जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. आठवड्याच्या मध्यात भावंडांकडून थोडं कमी सहकार्य मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या समस्या संपतील.