Kolhapur Rain Update : कोल्हापुुरात पावसाची उसंत; प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पावसाची संततधार सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात 3 फुटांनी वाढ झाली.
नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा सर्वदूर पसरली आहे.
राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी 32.2 फुटांवर गेली आहे
दरम्यान, जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.87 टीएमसी पाणीसाठा आहे.
आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ बंधारे पाण्यात आहेत.
वारणा नदीवरील- चिंचोली बंधारा पाण्यात आहे
भोगावती नदीवरील- शिंरगाव,हळदी, राशिवडे व सरकारी कोगे बंधारा पाण्यात आहे.
कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजारभोगाव, पेंडाखळे व करंजफेण बंधारा पाण्यात आहे.