T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात एकही सामना न खेळता तीन खेळाडूंनी 5 कोटी रुपये कमावले; राहुल द्रविड यांना किती रुपये मिळणार?
T20 World Cup 2024: टी-20 क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघावर पैशांचा आणि बक्षिसांचा मोठा वर्षाव झाला. आयसीसीकडून 20.4 कोटी, तर बीसीसीआयकडून 125 कोटी रुपये बक्षिसाची रक्कम देण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीसीसीआयने जाहीर केलेल्या 125 कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेपैकी 15 खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळतील.
विशेष म्हणजे प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळालेल्या 15 खेळाडूंमध्ये असे तीन चेहरे आहेत ज्यांनी एकही सामना खेळला नाही.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही एकूण बक्षीस रकमेपैकी 5 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत.
उर्वरित प्रशिक्षकमधील सदस्यांना प्रत्येकी 2.5 कोटी रुपये मिळतील.
भारतीय संघाच्या वरिष्ठ निवड समितीच्या पाच सदस्यांना (ज्यात अजित आगरकरचा समावेश आहे) प्रत्येकी एक कोटी रुपये दिले जातील.
संघाचे चार राखीव खेळाडू (रिंकू सिंग, शुभमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद) यांनाही प्रत्येकी एक कोटी रुपये मिळतील.
यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहल हे संघात होते पण ते एकही सामना खेळले नाहीत. वरील खेळाडूंना देखील प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळणार आहेत.