Vastu Tips : चुकूनही 'या' दिशेला लावू नका आरसा; ठरेल तुमच्या फुटक्या नशिबाचं कारण, गरिबीला मिळेल आमंत्रण
वास्तुशास्त्रामध्ये घरातील काही गोष्टींची योग्य दिशा आणि स्थान सांगण्यात आलं आहे, ज्याचा अवलंब केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा नांदते आणि यापैकी एक म्हणजे आरसा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरसा चुकीच्या जागी ठेवला तर जीवनातील अडचणी कधीच संपत नाहीत. घराची वास्तू योग्य असेल, तरच घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते.
वास्तुशास्त्रानुसार, घरात आरसा योग्य दिशेला लावणं गरजेचं आहे, अन्यथा वास्तु दोष निर्माण होतो.
वास्तुदोष निर्माण झाल्यास घरात रोज कलह होतो. आर्थिक अडचणी, करिअरमधील अडथळे, आजार तुमची पाठ सोडत नाहीत. काही ना काही समस्या घरात कायम राहतात, त्यामुळे घरात आरसा योग्य दिशेला लावणं गरजेचं आहे.
बेडरूममध्ये आरसे लावू नयेत, असा सर्वसामान्य समज आहे. खरं तर, जेव्हा एखादी व्यक्ती रात्रभर झोपल्यानंतर उठते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नकारात्मक उर्जेचा प्रभाव जास्त असतो, त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहणं शुभ मानलं जात नाही. नेहमी चेहरा धुतल्यानंतरच आरशात पाहावं.
आरसा कधीही पश्चिम किंवा दक्षिण भिंतीवर लावू नये. या दिशेला आरसा लावल्याने घरात अशांतता निर्माण होते.
स्वयंपाकघरात किंवा किचनच्या समोर आरसा लावू नये, असं केल्याने घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
आरसा बसवताना किंवा खरेदी करताना लक्षात ठेवा की आरसा स्वच्छ असावा, तुटलेला आरसा लावू नये. घरातील अस्वच्छ आरशांमुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ शकत नाही.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेलाच आरसा लावावा. घराच्या या दिशेला आरसा लावणं शुभ मानलं जातं. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जात असल्याने या दिशेला आरसा लावल्यास घरात धनाचा प्रवाह राहतो आणि घरात सुख-समृद्धी राहते.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण, पश्चिम, आग्नेय, वायव्य आणि नैऋत्य कोपऱ्यांच्या भिंतींवर चुकूनही आरसा लावू नका. असं केल्याने मोठी हानी होऊ शकते.