लग्नानंतर 4 वर्षांनी मोडला संसार; आता दर महिन्याला पोटगी म्हणून देतो लाखो रुपये, मोहम्मद शमीची लव्हस्टोरी
2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात मोहम्मद शमी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. केवळ 7 सामने खेळत मोहम्मद शमीने ही कामगिरी केली. आज मोहम्मद शमीचा 34 वा वाढदिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमैदानावर चांगली कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीला वैयक्तिक आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे.
मोहम्मद शमीने 2014 मध्ये हसीन जहाँशी लग्न केले. त्यांचे लग्न चार वर्षे सुरळीत चालले. मात्र त्यानंतर 2018 मध्ये हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार, मारहाण, विवाहबाह्य संबंध आणि मॅच फिक्सिंगसारखे अनेक गंभीर आरोप केले.
एवढेच नाही तर हसीन जहाँने शमीविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली होती. यानंतर शमीच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. बीसीसीआयनेही त्याचा केंद्रीय करार रोखला होता.
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ 2012 मध्ये भेटले आणि हळूहळू त्यांची मैत्री वाढू लागली जी नंतर प्रेमात बदलली. त्यानंतर दोघांनी 6 जून 2014 रोजी लग्न केले.
यानंतर 2015 मध्ये दोघेही एका मुलीचे पालक झाले. त्यानंतर 2018 मध्ये हसीन जहाँने शमीवर अनेक आरोप केले. त्यानंतर दोघांनीही वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ अनेक दिवसांपासून वेगळे राहत आहेत. तसेच घटस्फोटाबाबतचं प्रकरण न्यायालयात सुरु आहे. या प्रखरणी निकाल देताना न्यायालयाने शमीला हसीन जहाँला दरमहा 1 लाख 30 हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हटले होते.