Vastu Tips : पैशांबरोबर 'या' 3 वस्तू चुकूनही ठेवू नका; आयुष्यभरासाठी व्हाल कंगाल
वास्तू शास्त्रानुसार, पैशांशी संबंधित छोट्या-मोठ्या चुका आर्थिक तंगीचं कारण ठरु शकतात. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी चुकूनही तुटलेची काच, आरसा ठेवू नये. यामुळे पैशांना बरकत येत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच, फुकट मिळालेल्या वस्तू जसे की, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, श्रृंगाराच्या वस्तू कधीही पैशांबरोबर ठेवू नये. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
मेहनतीने कमावलेल्या पैशांबरोबर कधीही वाईट मार्गाने कमावलेला पैसा, दागिने ठेवू नका. यामुळे सर्व धनसंपत्ती निघून जाते. यामुळे तुम्ही अकाली कंगाल होऊ शकता.
अनेकदा लोक आपल्या पर्समध्येच चावी ठेवतात. पण, वास्तू शास्त्रानुसार हे चुकीचं आहे. यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता भासू शकते.
पर्समध्ये पैशांबरोबरच विनाकारण ठेवलेल्या चिठ्ठ्या, बिल यांसारख्या वस्तू ठेवू नयेत. यामुळे हातात पैसा टिकत नाही.
माहितीसाठी, काळ्या रंगाचे कपडेदेखील तिजोरीत ठेवू नयेत. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि पैशांचा प्रवाह थांबतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)