Vastu Tips : जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त असाल, तर घरात हे रोप लावा, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल!
Vastu Tips for Hibiscus Plant: वास्तूशास्त्रात घरातील झाडे आणि वनस्पतींचे विशेष महत्त्वही सांगण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवास्तूनुसार घरात विशिष्ट प्रकारची फुले लावल्याने ग्रह बलवान होतात आणि आर्थिक अडचणीही दूर होतात.
वास्तूमध्ये जास्वंदीचे फूल विशेष फायदेशीर मानले गेले आहे. देवी लक्ष्मीला जास्वंदीचे फूल खूप प्रिय आहे.
घरात लावल्याने सूर्य बलवान होतो आणि आर्थिक अडचणींपासूनही मुक्ती मिळते.
जर तुमच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमकुवत असेल तर तुमच्या घरात जास्वंदीचे रोप नक्कीच लावा. घराच्या पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने सूर्याची स्थिती मजबूत होते.
जास्वंदी रोप लावल्याने पत्रिकेत सूर्याची स्थिती मजबूत होते आणि कधीही आर्थिक समस्या उद्भवत नाहीत.
या रोपाची लागवड केल्याने घरात वडिलांचे नाते नेहमी चांगले राहते आणि मान-सन्मानाचे नाते कायम राहते.
जास्वंदी वनस्पती मंगल दोष देखील नष्ट करते. जर तुमचा मंगळ कमजोर असेल किंवा लग्नाला उशीर होत असेल तर घरामध्ये जास्वंदीचे फूल लावणे शुभ मानले जाते.
वास्तूनुसार देवी लक्ष्मीला जास्वंदीचे फूल अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांपासून लवकर आराम मिळतो आणि घरात धन-धान्य टिकून राहते.
वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की, ज्या घरात जास्वंदीचे फूल लावले जाते. त्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि सकारात्मक ऊर्जा राहते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)