प्रेताला अग्नी देऊन स्मशानातून घरी परतल्यावर आंघोळ का करायची? जाणून घ्या, 'ही' 5 कारणं
पण यामागचं कारण तुम्हाला माहितीय का? यामागील खरं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShamshan Ghat: सनातन धर्मात अंत्यसंस्काराबाबत एक मान्यता आहे. मृतदेहाला मुखाग्नी दिल्यानंतर आंघोळ करण्यास सांगितलं जातं. तुम्ही कधी विचार केलाय का? असं का सांगितलं जात असेल?
पुराणांमध्ये यामागील कारण सांगितलं गेलं आहे. स्मशानात नकारात्मक शक्ती असतात. ज्याचा परिणाम मानवावर होऊ शकतो. याच कारणामुळे स्मशानातून आल्यानंतर आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो.
यामागे एक वैज्ञानिक कारणंही सांगितलं जातं. तज्ज्ञांच्या मतानुसार, अंत्यसंस्कारावेळी मृतदेहाच्या आसपास राहिल्यामुळे अनेक विषाणू पसरता.
तसेच, त्यामुळे अनेक आजार पसरण्याचा धोका वाढतो. अशातच अंत्यसंस्कार करताना आजार पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे अंत्यसंस्काराहून आल्यानंतर आंघोळ करावीच, असं सांगितलं जातं.
अंत्यसंस्काराहून आल्यानंतर आंघोळ केल्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो आणि मृतदेहाच्या संपर्कात आल्यानं होणारे गंभीर आजारांपासून बचाव होतो.
ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्यावेळी त्याच्या शरीरात अनेक बदल होतात.
शरीर बॅक्टेरियांशी लढण्याची क्षमता गमावतं, अशातच मृतदेहाच्या संपर्कात आल्यानं आजारी पडण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे लोक स्मशानातून आल्यानंतर आंघोळ करतात.
एकंदरीतच पाहिलं तर, ही परंपरा शरीराची स्वच्छता आणि बचा या उद्देशानं पाळली जाते. दरम्यान, स्मशानभूमीतून परत आल्यानंतर आणि आंघोळ केल्यावर प्रत्यक्षात तुम्ही आजारी पडत नाही, हे कुठेही सिद्ध झालेले नाही.
वरील बाब आम्ही केवळ माहिती म्हणून देत आहोत, यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.