Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Tips : बेडरूममध्ये चुकूनही लावू नका 'या' पेंटिंग्स; पती-पत्नीमध्ये होतील वाद, संशयी वृत्ती वाढेल
वास्तुशास्त्रात घरातील वस्तूंचं ठराविक स्थान सांगण्यात आलं आहे. घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते, ज्यामुळे घरातील सदस्यांच्या प्रगतीवर परिणाम होतो. या वस्तूंपैकी एक म्हणजे, घरात लावलेले फोटो आणि पेंटिंग्स.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरात कोणतेही फोटो कुठल्याही जागी लावले तर जीवनातील अडचणी कधीच संपत नाहीत. घराची वास्तू योग्य असेल, तरच घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते.
वास्तुशास्त्रानुसार, घरात पेंटिंग्स किंवा फोटो योग्य दिशेला लावणं गरजेचं आहे, अन्यथा वास्तु दोष निर्माण होतो.
वास्तूशास्त्रानुसार, घरात लावलेले पेंटिंग्स आणि फोटोंचा घरातील ऊर्जेवर विशेष परिणाम पडतो. बेडरूममध्ये काही पेंटिंग किंवा फोटो लावल्याने वास्तू दोष निर्माण होतो. याचाच परिणाम म्हणजे पती-पत्नीमध्ये सतत वाद होतात, खटके उडतात आणि संशयी वृत्ती वाढते.
बेडरुममध्ये भूत, पिशाच्चाशी संबंधित कोणतंही पेंटिंग कधीही ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मक शक्ती वाढते. जर तुम्ही बेडरूममध्ये असं पेंटिंग ठेवलं असेल तर ते लगेच काढून टाका.
वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये युद्धाचं चित्र लावू नये. असे फोटो घरातील वाद वाढवण्याचं काम करतात. असे फोटो लावल्याने पती-पत्नीमधील भांडणं वाढतात.
बेडरूममध्ये एकाच प्राण्याचा किंवा माणसाचा फोटो लावू नये, यामुळे एकटेपणा निर्माण होतो. जोदीडार असूनही नसल्याची भावना निर्माण होते.
वास्तूनुसार, बेडरूममध्ये अग्नीचा फोटोही लावू नये. आग हे विनाशाचं प्रतीक मानलं जातं आणि अशा अग्नीचा फोटो बेडरूममध्ये ठेवल्याने पती-पत्नीमध्ये रागाची भावना वाढते.
दिवंगत पूर्वजांचे फोटो देखील बेडरूममध्ये लावू नये. वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये असे फोटो लावल्याने पती-पत्नीत कलह होत राहतात. पूर्वजांचे फोटो हे नेहमी पूजेच्या खोलीच्या ईशान्य कोपऱ्यातील भिंतीवर लावावे.
बेडरूममध्ये पाण्याशी संबंधित फोटो लावणं देखील टाळावं. अशा फोटोंमुळे पती-पत्नीच्या नात्यात अस्थिरता निर्माण होते आणि संशयी वृत्ती वाढत जाते.