Tulsi Vivah Upay 2024 : तुळशी विवाहाच्या दिवशी 'हे' 3 उपाय कराच; घरात सुख-समृद्धीसाठी या गोष्टी महत्त्वाच्या
तुळशी विवाह 13 नोव्हेंबर 2024 रोजी म्हणजेच उद्या देशभरात साजरा केला जाणार आहे. या दिवशी शालिग्राम आणि तुळस यांचा विवाह केला जातो. या दिवशी काही उपाय केल्याने आपल्याला त्याचा चांगला लाभ मिळतो. तसेच, देवी लक्ष्मीचा वास राहतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुळशी विवाहाच्या दिवशी सौभाग्याचं सामान जसे की, कुंकू, अलंकार, बांगड्या, लाल साडी , शेंदूर तुळशीच्या चरणी अर्पण करा.
तसेच, कच्चं दूध, मिठाईचा नैवेद्य दाखवावा. पूजेच्या नंतर या वस्तू एखाद्या गरीब सुवासिनीला अर्पण करा. यामुळे दूर्भाग्य दूर होऊन घरात सुख-समृद्धी येते.
ॐ तुलसीदेव्यै च विद्महे, विष्णुप्रियायै च धीमहि, तन्नो वृन्दा प्रचोदयात् ।। तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी पूजेच्या दरम्यान या मंत्राचा जप करा.
तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान शालिग्राम आणि देवी तुळशीचा विवाह केला जातो. या दिवशी हा विवाह विधीनुसार संपन्न करावा. तसेच, तुळशी मंत्राचा जप करावा. यामुळे वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदते.
तुळशी विवाहाच्या दिवशी तुमच्या जोडीदाराबरोबर मंगलाष्टकाचं पठण करावं. यामुळे पती-पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होईल.
तुळशी विवाहाच्या दिवशी पिवळ्या रंगाचा धागा घेऊन त्याला 108 गाठी बांधा. त्यानंतर हा धागा तुळशीच्या रोपाला बांधा. त्यानंतर विधीवत पूजा करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)