Surya Grahan 2025 : तब्बल 100 वर्षांनंतर शनीचं संक्रमण आणि सूर्य ग्रहणाचा जुळून येणार संयोग; 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य
याच दिवशी आंशिक सूर्य ग्रहणसुद्धा लागणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी शनीचं संक्रमण आणि सूर्य ग्रहणाचा संयोग लागणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात नवीन बदल घडून येतील. यामुळे अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचं संक्रमण आणि सूर्यग्रहण लाभदायक ठरु शकतं. या काळात व्यापारी वर्गातील लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो.
तसेच, तुमची आर्थिक तंगी दूर होईल. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाईल.
शनीचं संक्रमण आणि सूर्य ग्रहणाचा संयोग धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील.
तसेच, ऑफिसमध्ये तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुमचं आरोग्य चांगलं राहील.
मकर राशीच्या लोकांसाठी सूर्य ग्रहण आणि शनीचं संक्रमण फलदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला वडिलोत्पार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळेल.
तसेच, तुम्ही जर गुंतवणूक केली असेल तर त्यातून तुम्हाला चांगला धनलाभ मिळेल. तुमचं प्रमोशन देखील होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)