एक्स्प्लोर
Surya Gochar 2025 : मिथुन राशीत सूर्याचा होणार प्रवेश; 'या' राशींचं नशीब काही तासांतच बदलणार, करिअरला मिळणार वेगळी दिशा
Surya Gochar 2025 : आज रविवारी म्हणजेच 15 जून 2025 रोजी सकाळी 1 वाजून 58 मिनिटांनी सूर्य वृषभ राशीत प्रवास पूर्ण करुन मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.
Surya Gochar 2025
1/8

वैदिक शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य आज मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे अनेक राशींना शुभ फळ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
2/8

आज रविवारी म्हणजेच 15 जून 2025 रोजी सकाळी 1 वाजून 58 मिनिटांनी सूर्य वृषभ राशीत प्रवास पूर्ण करुन मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सूर्य 16 जुलैपर्यंत असणार आहे. त्यानंतर सूर्याचा कर्क राशीत प्रवेश होणार आहे.
3/8

ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्याचं संक्रमण फार खास मानलं जाणार आहे. कारण हे संक्रमण रविवारी होणार आहे. त्याचबरोबर सूर्याच्या संक्रमणानंतर मिथुन राशीत सूर्य, गुरु आणि बुध ग्रहाची युती होऊन त्रिग्रही योग जुळून येणार आहे.
4/8

मिथुन रास - सूर्याचं संक्रमण या राशीच्या लग्न भावात होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. तसेच, बिझनेसमध्ये प्रगतीचे योग जुळून येणार आहेत. वाहनसुख तुम्हाला मिळू शकते.
5/8

सिंह रास - सूर्य या राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण अकाराव्या चरणात होणार आहे. या काळात तुम्हाला धनलाभ मिळेल. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
6/8

तूळ रास - तूळ राशीच्या नवव्या चरणात हे संक्रमण होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल. बिझनेस आणि नोकरदार वर्गातील लोकांची कामाच्या ठिकाणी प्रगती दिसून येईल.
7/8

कुंभ रास - सूर्याचं संक्रमण कुंभ राशीच्या पाचव्या चरणात होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची वैवाहिक स्थिती चांगली असेल.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 15 Jun 2025 09:36 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















