Sindhudurg : दक्षिण कोकणातील जागृत आणि प्रसिद्ध जैतिर उत्सवाला सुरुवात; नवसाला पावणाऱ्या देवाला शेकडो भाविकांची गर्दी, पाहा फोटो
दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील जैतिर मंदिरात जैतिर उत्सवाला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवसाला पावणारा नराचा नारायण म्हणून जैतिर देव प्रसिद्ध आहे.
तुळस गावचं प्रमुख देवस्थान असलेल्या जैतिर मंदिरात पुढील 11 दिवस जैतिर उत्सव सुरू असणार आहे.
पहिल्याच दिवशी शेकडो भाविकांची गर्दी हा उत्सव पाहायला झाली होती.
साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त काळापासून हा जैतिर उत्सव दरवर्षी साजरा केला जातो.
माहेरवाशींना पावणारा नराचा नारायण म्हणून प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्र राज्यासह गोवा, कर्नाटकमधून मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येथे येत असतात.
पावसाच्या तोंडावर हा जैतिर उत्सव असल्याने या उत्सवात शेतीची अवजारं विकण्यासाठी आणली जातात.
जैतिर उत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
कवळासाने या उत्सवाची सांगता होते.