Monsoon : दिलासादायक! महाराष्ट्रात मान्सून दाखल
राज्यातील जनतेसाठी अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे. अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (Rain) महाराष्ट्रात आगमन झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमान्सूनचे आगमन बाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे.
नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.
राज्यात अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे.
राज्यात कधी पावसाचे आगमन होणार याची सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर आज पावसाचे आगमन झाले आहे. राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाले होते.
मागील तीन ते चार दिवसापासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता.
कधी पाऊस येणार म्हणून राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते.
लवकरच राज्यात मान्सून धडकणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली होती. अखेर मान्सून दाखल झाला आहे.
नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचला आहे.
मान्सूनचे आगमन बाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे.