Shravan 2024 : एकवेळ मांसाहार करा, पण श्रावण महिन्यात 'हे' तीन पदार्थ चुकूनही खाऊ नका, अन्यथा...
श्रावणात आहाराबाबत काही पथ्यं सांगितली जातात, त्यांचं पालन केल्यास व्यक्ती सुखासुखी जीवन जगू शकतो. शास्त्रानुसार, श्रावणात आहाराचं पथ्य पाळल्यास माणसाला दीर्घायुष्य लाभतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रावणात भरपूर पाऊस पडत असतो आणि यामुळे आपली भूक वाढते, परंतु पचनक्रिया मंदावलेली असते. अशा काळात तळलेले पदार्थ पचायला जड जातात. या काळात आपली झोपही पूर्ण होत नाही. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी सारखे आजार डोकं वर काढतात. म्हणून या काळात आहाराशी संबंधित काही पथ्यं पाळली पाहिजे.
आहाराबाबत पहिलं पथ्य म्हणजे, पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत होत असल्याने या काळात तामसी आहाराचं सेवन करू नये, असं सांगितलं जातं. यात कांदा, लसूण, मांसाहार, मद्य या सगळ्याचाच समावेश होतो.
आहाराबाबतच्या या सवयीचं काटेकोरपणे पालन व्हावं म्हणून या पथ्यांना धार्मिक वळण दिलं गेलं आहे. धर्मकार्याची जोड दिली असता लोक नियमांचं पालन करतात आणि श्रावण पाळतात.
आहाराबाबत दुसरं पथ्य म्हणजे, श्रावणात पालेभाज्या खाऊ नये. पावसाळ्यात पालेभाज्या पचायला जड असतात, या काळात पालेभाज्यांवर अनेक सूक्ष्मजीव आढळतात. ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. या भाज्या कितीही धुवून घेतल्या तरी ते जात नाहीत, म्हणून श्रावणात पालेभाज्या टाळाव्या.
श्रावण मासात वांगी देखील खाऊ नये.
तिसरं पथ्य म्हणजे, श्रावणात कडधान्यांचा वापरही टाळावा. कडधान्य पौष्टिक असली तरी पचायला जड असतात, म्हणून श्रावणाच कडधान्यांचं सेवनही करू नये.
मग आता श्रावणात खावं तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर श्रावणात मोसमी फळांचा फलाहार करावा. ही फळं शरीराला आवश्यक असेलल्या पोषक तत्त्वांची गरज भागवते.
याशिवाय गहू, तांदूळ, ज्वारी, फळभाज्या, गोड पदार्थ, दही, दूध, तूप, ताक यांचाही आहारात समावेश केला असता जेवण रुचकर होतं आणि अंगी लागतं. या पदार्थांमुळे पोट बिघडत नाही आणि तब्येत चांगली राहते.
या पथ्यांचं पालन केल्यास तुम्ही निरोगी आणि दीर्घायुष्यी जीवन जगाल. 5 ऑगस्टला सुरू होणाऱ्या श्रावणाची आताच तयारी करा आणि आखाड चांगला साजरा करा.