Shardiya Navratri 2024 : नवरात्रीत 'या' गोष्टी खाणं वर्ज्य; वाचा संपूर्ण लिस्ट, अन्यथा होईल पश्चात्ताप
खरंतर, नवरात्रीच्या नऊ दिवसांत उपवासाच्या वेळी फळंच खाऊ शकतात. त्याचबरोबर, बटाटा, दूध, दही याच्या व्यतिरिक्त काही लोक साबुदाणा, सिंगाड्यापासून बनलेल्या पदार्थांचं सेवन करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच, या उपवासाच्या दिवसांत तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील खाऊ शकता थोडक्यात सांगायचं तर, नवरात्रीत सात्विक पदार्थांचंच सेवन करावं.
काही लोकांमध्ये तर उपवासाला नेमकं काय खावं आणि काय खाऊ नये? याबाबतच संभ्रम पाहायला मिळतो. मात्र, या काळात अन्नाचं सेवन केलं जात नाही तसेच, मसालेदार पदार्थांचंही सेवन करु नये.
नवरात्रीत कोणत्याही प्रकारचं धान्य जसे की, गहू, तांदूळ, डाळ, ज्वारी, बाजरी, रवा, बेसन यांचं सेवन करु नये. तसेच, लसूण-कांदाही खाऊ नये. तामसिक पदार्थांचं सेवन करु नये. यामुळे पवित्रता नष्ट होते.
व्रताच्या वेळी कॅफिनचं सेवन करु नये. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यापेक्षा दुधाचं सेवन करावं. त्याशिवाय वांगी, कोबी यांसारख्या भाज्यांचंही सेवन नवरात्रीत करु नये.
नवरात्रीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिळ्या पदार्थांचं सेवन करु नये. शिळे पदार्थ खाल्ल्याने व्रत मोडतो. जसे की, साबुदाणा खिचडी.
नवरात्रीत काकडी आणि टोमॅटोचं देखील सेवन करावं. याशिवाय, अद्रक, गाजर तुम्ही खाऊ शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)