Surya Grahan 2024 : आज सर्वपित्री अमावस्या; आजच्या दिवशी अजिबात करू नका 'या' चुका, घरावर कोसळेल संकटांचा डोंगर

हिंदू धर्मात सर्वपित्री अमावस्येला (Sarva Pitri Amavasya 2024) विशेष महत्त्व आहे. ज्या लोकांना पितरांची निश्चित तारीख माहीत नसते, असे लोक सर्वपित्री अमावस्येला पितरांचं श्राद्ध घालतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ज्यांना 16 दिवसांच्या पितृ पक्षाच्या काळात श्राद्ध घालता आलं नाही, असे लोक देखील सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध घालतात.

यंदा सर्वपित्री अमावस्या 2 ऑक्टोबरला आहे, याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे. त्यामुळे या काळात काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
अमावस्येला श्राद्धाचं भोजन कधीही रात्रीच्या वेळी देऊ नये.
सर्वपित्री अमावस्येला कुटुंबातील सदस्यांनी तामसिक भोजन करू नये. या दिवशी चिकन, मटण खाऊ नये. दारुचे सेवन करू नये.
ब्राह्मण आणि कुटुंबातील सदस्यांनी ब्राह्मण भोजनाच्या वेळी मौन बाळगावे.
केळीची पानं आणि स्टीलच्या भांड्यांमध्ये श्राद्धाचं भोजन जेवायला देऊ नये.
श्राद्धावेळी पान, चांदी, तांबे, कांस्य यापासून बनवलेल्या भांड्यांमध्ये जेवायला दिलं जाऊ शकतं.
चुकूनही कर्ज घेऊन श्राद्ध घालू नये.
अमावस्येच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये आणि कोणाबद्दल अपशब्द वापरू नये.