Shardiya Navratri 2024 Rashi: माता दुर्गेला 'या' राशी प्रिय; ज्यांच्यावर कायम राहते देवीची कृपा, होते भरभराट
3 ऑक्टोबर 2024 पासून देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून वातावरण भक्तिमय झालं आहे. सगळीकडे जगदंबेच्या नावाचा जयघोष सुरू आहे. या काळात प्रत्येक घरात दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाता दुर्गेला 'शक्तीस्वरूपा' म्हणतात. नवरात्रीमध्ये दुर्गेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं की, नवरात्रोत्सवात आईभवानी पृथ्वीवर वास करते. दुर्गा मातेची उपासना केल्यानं भक्तांची दु:ख, त्यांच्यावरची संकटं दूर होतात.
ज्योतिषशास्त्रातही भगवतीच्या उपासनेचे तपशीलवार वर्णन केलं आहे. ज्योतिषांच्या मते, काही राशी आहेत ज्या माता दुर्गाला खूप प्रिय आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांवर मातेचा आशीर्वाद नेहमीच असतो.
जाणून घेऊया या राशींबद्दल सविस्तर...
वृषभ रास (Taurus): ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचं आराध्य दैवत म्हणजे, माता दुर्गा. म्हणून, वृषभ राशीच्या चिन्हावर देखील मातेचा विशेष आशीर्वाद असतो. अशा परिस्थितीत नवरात्रीच्या काळात वृषभ राशीच्या लोकांनी विधीनुसार पूजा करावी.
सिंह रास (Leo): माता दुर्गा सिंहावर स्वार होऊन येते... म्हणूनच तिला सिंहवाहिनी असंही म्हणतात. हे दुर्देचं एक नाव आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांवर दुर्गेचा आशीर्वाद नेहमी राहतो. आईच्या कृपेनं अशा लोकांची त्यांच्या करिअरमध्ये, व्यावसायात प्रगती होते. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या काळात आदिशक्तीच्या नऊ रूपांची पूजा करणं त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.
तूळ रास (Libra): ज्योतीषी सांगतात की, तूळ राशीच्या लोकांचं आराध्य दैवत शुक्र ग्रह आणि देवी दुर्गा आहे. त्यामुळे दुर्गा मातेची भक्तिभावानं पूजा केल्यास त्याचे फायदे नक्कीच मिळतात. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीची पूजा करावी आणि स्तोत्र-मंत्राचा जप करावा. यामुळे तूळ राशींच्या लोकांची भरभराट होते.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही.)