तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
केंद्र सरकारकडून देशातील लोकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवतं. ज्यामध्ये बहुतांश योजना लोकांच्या गरजा लक्षात घेऊन राबवल्या जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरोग्य हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे होणारा खर्च टाळण्यासाठी लोक आरोग्य विमा उतरवतात.
परंतु प्रत्येकाकडे आरोग्य विमा उतरवण्यासाठी पुरेसे पैसे नसतात. केंद्र सरकार अशा लोकांना मदत करतं. यासाठी शासन मोफत उपचार योजना राबवतं.
2018 मध्ये, केंद्र सरकारनं प्रधानमंत्री आयुष्मान योजना सुरू केली. या योजनेंतर्गत सरकार गरजू लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देते.
मात्र, या योजनेसाठी काही नियम आणि पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्या आधारे लोकांचं आयुष्मान कार्ड बनवलं जातं.
योजनेचे नियम जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. यापैकी एक नियम म्हणजे, अर्जदाराच्या घरात फ्रीज असेल तर...
जर अर्जदारांच्या घरात फ्रिज असेल तर त्याचं आयुष्मान कार्ड बनलं जात नाही.
ज्यांच्या घरी लँडलाईन फोन आहे, त्यांनाही आयुष्मान कार्ड मिळत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे कार, बाईक आणि रिक्षा आहे, त्यांनाही आयुष्मान कार्ड मिळणार नाही.