Shani Vakri 2023 : आजपासून कुंभ राशीत शनि ग्रहाचा उलट फेर सुरु; अनेक राशींचं भाग्य खुलणार, होईल धनलाभ
140 दिवस उलटी चाल केल्यानंतर शनि या राशीमध्ये मागे जाईल. शनीच्या पूर्वग्रहीमुळे काही राशींच्या अडचणी वाढतील, तर काहींना खूप फायदा होईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज 17 जून रोजी रात्री 10 वाजून 48 मिनिटांनी शनि ग्रहाची वक्री होईल आणि तो उलट मार्गाने प्रवास करेल. यानंतर 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत शनिचा हा प्रवास कायम राहिल.
ज्योतिष शास्त्रानुसार, वक्री अवस्थेमध्ये शनी अधिक शक्तीशाली होतो. यामुळे काही राशींना याचा भरपूर लाभ मिळतो.
मेष रास (Aries) : शनि वक्रीचा मेष राशीच्या लोकांनाही फायदा होणार आहे. कुंभ राशीत वक्री झालेला शनि संपूर्ण 140 दिवस मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दरम्यान तुम्हाला करिअरपासून व्यवसायापर्यंत खूप प्रगती मिळेल. या काळात तुम्ही शनिदेवाच्या कृपेने केलेलं प्रत्येक काम यशस्वी होईल.
मिथुन रास (Gemini) : शनि वक्रीमुळे मिथुन राशीच्या लोकांचंही भाग्य खुलणार आहे. तुमच्या अनेक समस्या दूर होतील आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
वृषभ रास (Taurus) : शनि वक्रीमुळे वृषभ राशीमध्ये केंद्र त्रिकोण योग तयार होईल, याचा तुम्हाला खूप फायदा होईल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.
सिंह रास (Leo) : सिंह राशीच्या लोकांवर शनि ग्रहाची कृपा राहणार आहे. शनि वक्रीमुळे सिंह राशीमध्ये शश राजयोग तयार होईल. यामुळे मंदीत असलेली आर्थिक स्थिती मजबूत होईल.
मकर रास (Capricorn) : शनि वक्री मकर राशीच्या लोकांसाठीही लाभदायक ठरणार आहे. मकर राशीच्या लोकांना या काळात धनप्राप्ती होईल. तसेच नोकरी-धंद्यातही यश मिळण्याचा योग आहे.