Shani Margi 2024 : अवघ्या काही तासांत शनीची मार्गी चाल; 24 तास 'या' 3 राशींवर असणार शनीची करडी नजर
ग्रहांचा न्यायाधीश शनी 15 नोव्हेंबर 2024 रोजी आपली स्वराशी म्हणजेच कुंभ राशीत मार्गी होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशनीच्या चालीत बदल झाल्याने काही राशींच्या लोकांना लाभ मिळणार आहे. तर काही राशींना या काळात सावधान राहण्याची गरज आहे.
शनी आपल्या मार्गी म्हणजेच सरळ चालीने सर्व 12 राशींवर परिणाम करतात. यामुळे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक बाबतीत परिणाम होतो. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
शनीच्या मार्गीमुळे सिंह राशीच्या लोकांना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही आर्थिक बाबतीत सतर्कता बाळगावी. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे.
तसेच, कोणत्याही वादविवादात पडू नका. तुमच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. व्यापारी वर्गाला सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातोय.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीचं मार्गी होणं काहीसं आव्हानात्मक ठरु शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, जर तुम्ही तुमचा व्यवसाय अधिक वाढवण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ नाही.
या काळात कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवू नका. तसेच, तुम्ही तुमच्या आरोग्याच्या बाबतीत सतर्क असण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मकर राशीच्या लोकांसाठी शनीचं मार्गी होणं संकटाचं ठरु शकतं. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमच्या लव्ह-लाईफमध्ये चढ-उतार होऊ शकतात.
यासाठी तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कोणताही निर्णय घेताना सावध व्हा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)