Shani Margi : 15 नोव्हेंबरला शनीची मार्गी चाल! 'या' 3 राशी होतील मालामाल, मागाल ती इच्छा होईल पूर्ण
शनीला न्यायदेवता म्हटलं जातं. मान्यतेनुसार, शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App15 नोव्हेंबर रोजी शनीच्या चालीत परिवर्तन होणार आहे. याचा अनेक राशीच्या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मेष राशीच्या लोकांना या काळात चांगलं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी असणारा ताण संपेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे काम या काळात पूर्ण होईल.
तुमच्या मित्रांचा तुम्हाला चांगला सहभाग मिळेल. तसेच, नात्यात विश्वास निर्माण होईल.
कर्क राशीच्या लोकांना शनीच्या मार्गीचा चांगला लाभ मिळणार आहे. तुमचं काम अधिक वेगाने वाढेल. तसेच, अनेक काळापासून रखडलेले तुमचे काम या वेळेस पूर्ण होईल.
पैसे गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांना शनीचं मार्गी होणं फार शुभकारक ठरणार आहे. तुमच्या जीवनात सुरु असलेले संकट कमी होतील.
तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)