Bala Nandgaonkar: पाय जायबंदी, राज ठाकरे लाडक्या 'बाळा'ला भेटले; नांदगावकरांचा शिवडीत व्हीलचेअरवर बसून प्रचार
आगामी महाराष्ट्र विधानसभेसाठी शिवडी मतदारसंघातून मनसेकडून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Image Credit- Bala Nandgaonkar FB)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवडी मतदारसंघात मनसेचे बाळा नांदगावकर आणि महाविकास आघाडी (ठाकरे गटाचे) अजय चौधरी यांच्यात थेट लढत होणार आहे. (Image Credit- Bala Nandgaonkar FB)
बाळा नांदगावकरांना भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बाळा नांदगावकर आणि अजय चौधरीची लढत रंगतदार होणार आहे. (Image Credit- Bala Nandgaonkar FB)
बाळा नांदगावकर गेल्या काही दिवासांपासून शिवडीत जोरदार प्रचार करत आहे. मात्र याचदरम्यान त्यांच्या पायाला दुखापत झाली. (Image Credit- Bala Nandgaonkar FB)
इमारतीच्या पायऱ्यांवरून उतरताना बाळा नांदगावकरांचा तोल गेला आणि त्यांना पायाला दुखापत झाली. (Image Credit- Bala Nandgaonkar FB)
सदर घटनेनंतर बाळा नांदगावकरांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. (Image Credit- Bala Nandgaonkar FB)
बाळा नांदगावकरांना दुखापत झाल्याचं कळताच मनसेप्रमुख राज ठाकरेंनी त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली. (Image Credit- Bala Nandgaonkar FB)
राज ठाकरेंच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर पुन्हा प्रचारासाठी उतरले. (Image Credit- Bala Nandgaonkar FB)
बाळा नांदगावकर स्वतः व्हील चेअरवरून प्रचार करत आहेत. (Image Credit- Bala Nandgaonkar FB)
बाळा नांदगावकर व्हीलचेअरवरुन शिवडीमधील नागरिकांची भेट घेत आहेत. (Image Credit- Bala Nandgaonkar FB)