Shani Gochar 2024 : शनि आणि सूर्याची शुभ दृष्टी; 4 डिसेंबरपासून 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली रास बदलतो, अशात काही शुभ आणि अशुभ योग जुळून येतात, ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. यातच आता 4 डिसेंबर 2024 रोजी शनि आणि सूर्य एकमेकांपासून 90 अंशांवर भ्रमण करतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसूर्य आणि शनीची केंद्र दृष्टी तयार होत आहे, ज्यामुळे काही राशीच्या लोकांना बंपर फायदे मिळू शकतात. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus) : या राशीच्या लोकांनाही शनि-सूर्याच्या शुभ दृष्टीचा खूप फायदा होणार आहे. या राशीचे लोक त्यांचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकतात. तुम्ही तुमच्या कामात मग्न राहाल, यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.
व्यवसायात तुम्ही केलेली रणनीती यशस्वी होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील.
धनु रास (Sagittarius) : शनीची सूर्यावर पडणारी दृष्टी धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात धनु राशीचे लोक त्यांचं दीर्घकाळ रखडलेलं काम पूर्ण करू शकतात. या राशीच्या लोकांनी केलेल्या कामात त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकतं. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल, ज्यामुळे ते प्रत्येक ध्येय गाठण्यात यशस्वी होऊ शकतात.
तुम्हाला व्यवसायाशी संबंधित लांबचा प्रवास करावा लागू शकतो, यातही तुम्हाला बरंच यश मिळेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. पुरेसा पैसा कमावण्यात तुम्हाला यश मिळेल. यासोबतच तुमचे पैसेही वाचतील. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.
मीन रास (Pisces) : मीन राशीच्या लोकांसाठी शनि-सूर्याची स्थिती फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला कुटुंबासमवेत तीर्थयात्रेला जाता येईल. तुम्ही करत असलेल्या कामात तुम्हाला भरघोस यश मिळेल. तुमच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला बरेच फायदे मिळणार आहेत.
तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेलय शनीच्या शुभ दृष्टीमुळे तुम्हाला पदोन्नती मिळेल आणि तुमच्या पगारात वाढ होऊ शकते. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला लाभ मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.