Shani Dev : नवीन वर्षात 'या' 2 राशींवर शनीची करडी नजर; सुरु होणार ढैय्याचा प्रवास
29 मार्च रोजी शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या 2 राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने नवीन वर्ष फार महत्त्वाचं असणार आहे. या वर्षात शनी देखील आपली चाल बदलणार आहे. शनीच्या राशी परिवर्तनाने काही राशींवर साडेसाती आणि ढैय्या सुटणार आहे. तर, काही राशींवर ढैय्या आणि साडेसातीचा प्रभाव सुरु होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत रात्री 11 वाजून 01 मिनिटांनी प्रवेश करणार आहे. मीन राशीत शनीने संक्रमण करताच 2 राशींवर शनीची ढैय्या आणि साडेसाती सुरु होणार आहे.
शनीने मीन राशीत प्रवेश करताच सिंह राशीच्या लोकांवर शनीची ढैय्या सुरु होईल. सिंह राशीत ढैय्याचा प्रभाव अडीच वर्षांपर्यंत असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
तसेच, धनु राशीच्या लोकांवर देखील शनीची ढैय्या सुरु असणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे.
ज्या राशीच्या लोकांवर शनीची ढैय्या सुरु आहे. अशा लोकांनी शिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे. तसेच, शनीबरोबरच पिंपळाच्या झाडाची, भगवान हनुमानाची आणि भगवान शंकराची पूजा करावी. गरीबांना दान करावं. तसेच, ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान करु नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)