Thane Accident : ठाण्याच्या कॅडबरी जंक्शनला मालवाहू कंटेनर उलटला; वाहतुकीचा चक्काजाम, चाकरमान्यांचे हाल
सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुदैवानं या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पण, कंटेनरचं आणि त्यामधून नेल्या जात असलेल्या मालाचं मोठं नुकसान झालं आहे.
ठाण्याचा रहदारीचा रास्ता असलेल्या कॅडबरी जंक्शनवर मालवाहू कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यानं कंटेनर भर रस्त्यात उलटला.
कॅडबरी जंक्शनवरील अपघातामुळे घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीचा चक्काजाम झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि वाहतूक कोंडी सोडविण्याचे प्रयत्न सुरू केले.
सदर पलटी झालेला कंटेनर हा हायड्रॉलिक मशीनच्या सहाय्यानं बाजूला करत वाहतूक कोंडी दूर करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहिती दिल्यानुसार, अपघतात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
सकाळी सकाळी झालेल्या अपघातामुळे काही काळासाठी चाकरमान्यांना आणि इतर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता.
पण, आता कंटेनर हटवण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळत आहे.