Raksha Bandhan 2024 Wishes : रक्षाबंधनानिमित्त बहीण-भावाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा रक्षाबंधनाची गोडी, पाठवा हे शुभेच्छा फोटो
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, बहिण-भावाच्या दृढ नात्याचा हा सण, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बंध हा प्रेमाचा,नाव जयाचे राखी... बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती... राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
एक धागा, एक विश्वास, हा सण प्रत्येक भावाबहिणीसाठी खास, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे.. भाऊ माझा यशाने न्हाऊ दे.. राखी शिवाय काही नाही माझ्याकडे.. म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे.. हीच आहे माझी इच्छा.. राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
थोडी लढणारी, थोडी भांडणारी, थोडी चिडणारी, थोडी काळजी घेणारी, थोडी मस्ती करणारी एक बहीण असते, तीच तर रक्षाबंधन सणाची शान असते.. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भावाबहिणीचं नातं हे वेगळंच असतं, वेळ पडली तर एकमेकांसाठी जीव देतील, पण मागितल्यावर एकमेकांना एक ग्लास पाणीपण देणार नाहीत. म्हणूनच तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
राखी बांधून दरवर्षी तू देतोस रक्षणाचे वचन... प्रेमाने राहू आपण अगदी आयुष्यभर... रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!