Raj Thackeray : भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे! राज ठाकरे मनसे उमेदवारांना घेऊन अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनाला
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अक्कलकोटमध्ये जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविधानसभेचं रणशिंग फुंकल्यानंतर राज ठाकरे थेट स्वामी समर्थांच्या चरणी लीन झाले आहेत. अक्कलकोटमध्ये जाऊन त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं.
आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे, त्या पार्श्वभूमीवर देखील राज ठाकरेंनी अक्कलकोटला देखील भेट दिली.
दोन्ही उमेदवारांना घेऊन राज ठाकरेंनी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं.
बाळा नांदगावकर आणि दिलीप धोत्रेंच्या समवेत राज ठाकरे स्वामींच्या चरणी लीन झाले.
यानंतर राज ठाकरे पुढे तुळजा भवानीच्या दर्शनालाही जाणार आहेत.
आज सोलापूर दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी विधानसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली.
मनसेने दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी (Shivadi Assembly Constituency) पक्षाचा निष्ठावंत चेहरा बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतला आहे.
तर दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांना उमेदावारी जाहीर केली.