Numerology : 'महाकंजूष' असतात 'या' जन्मतारखेचे लोक; इतरांकडून पैसे काढणं यांच्या 'बाए हाथ का खेल'
अंक ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीच्या मूलांकावरुन त्या व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा असेल हे ओळखलं जाते. त्याप्रमाणे मूलांक 8 च्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते आज आपण जाणून घेणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमूलांक 8 असणाऱ्या लोकांचा स्वभाव फार शांत आणि गंभीर असतो. हे लोक एकांतात राहणं पसंत करतात.
लोकांशी संवाद साधायला, एखाद्या पब्लिक इव्हेंटमध्ये जायला यांना आवडत नाही.
या जन्मतारखेचे लोक फार कंजूस स्वभावाचे असतात. आपले पैसे नेहमीच जपून ठेवतात. कोणाशीही पैशांचा व्यवहार करणं यांना आवडत नाही.
या जन्मतारखेचे लोक फार महत्त्वाकांक्षी असतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करतात. तसेच, आयुष्यात येणाऱ्या संकटांचा मोठ्या धैर्याने हे सामना करतात.
यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी फार चांगली असते. हे लोक नोकरी करण्यापेक्षा व्यवसायाला जास्त प्राधान्य देतात. यामध्ये त्यांना जास्त फायदा मिळतो.
या जन्मतारखेच्या लोकांना लोकांशी जास्त संवाद साधायला आवडत नाही. हे आपली स्वत:चीच कंपनी पसंत करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)