Numerology : अत्यंत शांत स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, डोक्यात मात्र चालतो विचारांचा कल्लोळ
अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 7 असलेल्या लोकांची देखील काही वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमूलांक 7 चे लोक आपल्या भावना इतरांसमोर पटकन व्यक्त करत नाहीत. परंतु एक चांगली गोष्ट म्हणजे, अंकशास्त्रात काही मूलांकांच्या लोकांना फार भाग्यवान समजलं जातं, यामध्ये मूलांक 7 चाही समावेश आहे.
7, 16 किंवा 25 जन्मतारखेचे लोक फार शांत असतात, मनातील भावना इतरांसमोर ते पटकन व्यक्त करत नाहीत. या मूलांकाशी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रात 7 क्रमांकाचा संबंध गुरु ग्रहाशी आहे. असं मानलं जातं की, मूलांक 7 चे लोक रहस्यमय, अंतर्मुख आणि बुद्धिमान असतात.
मूलांक 7 चे लोक त्यांच्या मनातील गोष्टी सहजासहजी कोणाशी शेअर करत नाहीत आणि अनेकदा त्यांचे विचार आणि भावना लपवून ठेवतात.
मूलांक 7 च्या लोकांना त्यांचं आयुष्य खाजगी ठेवणं आवडतं. त्यांना त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करणं गरजेचं वाटत नाही.
7, 16 किंवा 25 जन्मतारखेचे लोक अंतर्मुख स्वभावाचे असतात. या लोकांना एकटं राहणं आवडतं. या मूलांकाचे लोक बुद्धिमान आणि जिज्ञासू असतात आणि ते नेहमी ज्ञान मिळवण्यासाठी उत्सुक असतात.
मूलांक 7 चे लोक स्वतंत्र असतात, त्यांना कुणाच्या ओझ्याखाली जगणं आवडत नाही. यासोबतच हे लोक स्वावलंबी असतात, कोणत्याही गोष्टीसाठी ते इतरांवर अवलंबून राहत नाहीत, इतरांवर अवलंबून राहणं त्यांना आवडत नाही.
हे लोक कोणतीही समस्या खोलवर समजून घेण्यास सक्षम असतात. या लोकांना अध्यात्मात विशेष रुची असते. हे लोक जीवनाचा सखोल अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
मूलांक 7 च्या लोकांची कल्पनाशक्ती चांगली असते. हे लोक आपल्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान सिद्ध होतात. हे लोक लहानपणापासूनच अभ्यासात खूप तल्लख असतात. हे लोक अनेकदा परीक्षेत टॉप करतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर हे लोक आपल्या कुटुंबाला वैभव मिळवून देतात.