Washim : आज नृसिंह महाराज जयंती; वाशिममधील इतिहासकालीन मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांची मांदियाळी
वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षच्या चतुर्दशीला, म्हणजे आजच्या दिवशी भगवान नृसिंह महाराजांची जयंती साजरी केली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशिम शहरात सतराव्या शतकातील इतिहासकालीन पुरातन भगवान बालाजी मंदिर आहे आणि याच मंदिरात दक्षिण पश्चिम दिशेला नृसिंह महाराजांचं छोटं मंदिर आहे.
या मंदिरात भगवान नृसिंह महाराज यांची पंचधातूची मूर्ती आहे.
वर्षातून एकदाच, म्हणजे आजच्या दिवशी नृसिंह महाराजच्या मंदिराच्या दाराचं पट उघडलं जातं.
आजच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 7 पर्यंत भाविकांसाठी मंदिर खुलं केलं जातं.
रात्री महाआरती पूजन झालं की दार पुन्हा बंद केलं जातं. बंद दरवाजे उघडल्या जातात ते थेट पुढल्या वर्षी आजच्याच दिवशी.
सकाळपासून भाविक नतमस्तक होण्यासाठी मंदिरात आवर्जून येत असतात.
या मंदिराला प्राचीन इतिहासाची साक्ष असून मंदिराचा इतिहास नागपूरचे संभाजी भोसले आणि जानोजी भोसले यांच्याशी जोडलेला आहे.