Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Siddhivinayak Mandir Prasad : सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूत उंदराची पिल्लं? पाहा फोटो
तिरुपती प्रसादाचा वाद ताजा असतानाच आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नुकताच तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांची चरबी मिसळल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोवर आता सिद्धीविनायक मंदिरातील प्रसाद शुद्धतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदराने पिल्लं दिली आहेत. समोर आलेल्या व्हिडीओनुसार, सिद्धीविनायक प्रसादाच्या पाकिटांवर उंदराची पिल्लं दिसत आहेत.
प्रसादाचे लाडू उंदरांनी कुरतडल्याचाही आरोप आता होत आहे. दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने हे आरोप फेटाळले आहेत.
समोर आलेला व्हिडीओ मंदिर परिसरातील नसून यामागे कोणाचं तरी षडयंत्र असल्याचं सरवणकर म्हणाले. कोणीतरी प्लॅस्टिकमध्ये उंदीर घालून ते प्रसादात ठेवले आणि त्याचा व्हिडीओ काढला असावा, असं सरवणकर म्हणाले. मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता असल्याचंही ते म्हणाले.
सिद्धीविनायक प्रसादाच्या टोपलीत उंदीर आढळळ्याच्या प्रकरणाची चौकशी होणार, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
मंदिर प्रशासन देखील घडलेल्या प्रकराची तपासणी करेल आणि योग्य ते स्पष्टीकरण देईल, असंही मुनगंटीवार म्हणाले.
व्हायरल फोटो आणि व्हिडिओची देखील तपासणी होणार आहे.
सिद्धिविनायक मंदिरात दररोज सुमारे 50 हजार लाडू रोज बनवले जातात. प्रसादाच्या एका पाकिटात प्रत्येकी 50 ग्रॅमचे दोन लाडू असतात.
सणासुदीच्या काळात प्रसादाची मागणी वाढते. प्रयोगशाळेच्या चाचणी अहवालानुसार, हे लाडू सात ते आठ दिवस साठवता येतात.
मात्र, लाडूंमध्ये उंदरांची पिल्लं आढळून आल्याने मंदिरातील प्रसादाच्या स्वच्छता आणि शुद्धतेबाबत मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत.