ओबीसीत समावेश केलेल्या कुणबीच्या तीन पोटजाती कोणत्या?; मंत्रिमंडळ निर्णयातून समोर
राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. तर, दुसरीकडे मराठा समाज आणि ओबीसी नेत्यांकडूनही आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील कुणीबी आणि मराठा एकच असल्याचं सांगत मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे.
त्याच पार्श्वभूमवीर राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही मोठे निर्णय घेतले आहेत, त्यामध्ये कुणबीच्या तीन पोट जातींचा इतर मागासवर्ग यादीत समावेश करण्यात आला आहे.
राज्य मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार आज मंत्रीमंडळाने “तिलोरी कुणबी”, “तिल्लोरी कुणबी”, “ति.कुणबी” या पोटजातींचा महाराष्ट्र शासनाच्या “इतर मागासवर्ग” प्रवर्गात समावेश केला आहे.
इतर मागासवर्ग यादीतील अ.क्र.83 येथे समावेश करण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
आयोगाच्या शिफारसीनुसार या पोटजातींचा महाराष्ट्र शासनाच्या “इतर मागासवर्ग” यादीतील अ.क्र.83 येथे कुणबी, पोट जाती लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार, मराठा कुणबी, कुणबी मराठा यांच्यापुढे समावेश होईल.
त्यामुळे, “तिलोरी कुणबी”, “तिल्लोरी कुणबी”, “ति.कुणबी” या तीन पोटजाती आता ओबीसीमध्ये समाविष्ट होत आहेत.