Makar Sankranti 2025: भाग्योदय होणार, धन-संपत्ती मिळणार; मकर संक्रातीनंतर 'या' 3 राशींचं नशीब पालटणार
मकरसंक्रांतीच्या दिवशी खरमास संपतो आणि शुभ कार्याला सुरुवात होते. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. त्यामुळे या दिवशी गंगा स्नान करणं शुभ मानलं जातं. तसेच, अशा व्यक्ती भाग्यवान असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दिवशी पहाटे सूर्याला अर्घ्य द्यावं. या दिवशी आपली इच्छा सांगितल्यानंतर भांड्यात पाणी, गंगाजल, कच्चं दूध, काळे तीळ, लाल चंदन टाकून आपल्या इच्छेनुसार सूर्याला जल अर्पण करावं.
2025 मध्ये 14 जानेवारीपासून मेष राशीच्या लोकांसाठी शुभ मुहूर्त सुरू होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचं सहकार्य मिळेल. तुम्हाला संततीचा आनंद मिळेल, तुम्ही कुटुंबासाठी काही खरेदी करू शकता.
सिंह राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. तुमच्या मेहनतीला फळ मिळेल आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल.
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे. तुमचं आरोग्य सुधारेल. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. व्यवसायात प्रगती होईल. करिअरच्या दृष्टीनं हा काळ अत्यंत शुभ आहे.