Mahakumbh Mela 2025: यंदाचा महाकुंभ मेळा विशेष आहे; पाहा कुंभमेळ्याची झलक!
हिंदू धर्मानुसार 2025 वर्षातला यंदाचा महाकुंभ मेळा हा खूप खास आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाकुंभ दर 12 वर्षांनी होतो आणि जेव्हा 12 वर्षांचा 12वा टप्पा पूर्ण होतो तेव्हा त्याला पूर्ण कुंभ म्हणतात.
प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार पवित्र स्थळांवर दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं.
यंदाचा कुंभमेळा प्रयागराजमध्ये 13 जानेवारी 2025 पासून सुरू झाला आहे आणि दररोज लाखो भाविक गंगा मातेत स्नान करण्यासाठी येत आहेत.
कुंभमेळ्याचा मुख्य उद्देश आहे, भक्तगण किंवा श्रद्धाळूंची आत्मशुद्धीची एक संधी देणे.
अशी मान्यता आहे की, कुंभमेळ्यात शाही स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते, पापांचा नाश होवून मोक्ष प्राप्ती होते.
कुंभमेळा म्हणजे साधू-संत, गुरु, भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान, भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
कुंभमेळ्यातील अनेक फोटो सध्या समोर येत आहेत.
कुंभमेळा म्हणजे साधू-संत, गुरु, भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान, भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे.