Mahashivratri : 2025 वर्षातील महाशिवरात्री नेमकी कधी असणार? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि शुभ योग
2025 नवीन वर्षातील महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. मान्यतेनुसार, या दिवशी पहिल्यांदा भगवान शंकर शिवलिंगाच्या स्वरुपात प्रकट झाले होते. असं म्हणतात की, महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगात भगवान शंकराचा वास असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाशिवरात्रीच्या रात्री जे लोक भगवान शंकराचा अभिषेक करतात. त्यांच्या सर्व समस्या भगवान शंकर दूर करतात. त्यानुसार,यंदा निशिता काळात जलाभिषेक करावं.
फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजून 08 मिनिटांपासून ते 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 08 वाजून 54 मिनिटांपर्यंत असणार आहे.
महाशिवरात्रीला निशिता काळात पूजा करावी. याचा शुभ मुहूर्त 26 फेब्रुवारी रोजी रात्री 12.09 पासून 12.59 पर्यंत असणार आहे.
महाशिवरात्रीला प्रथम प्रहर पूजा संध्याकाळी 06.19 पासून रात्री 09.26, दुसरा मुहूर्त रात्री 09.26 ते रात्री 12.34, तिसरा मुहूर्त रात्री 12.34 पासून ते रात्री 03.41 पर्यंत असणार आहे. तर, चौथा मुहूर्त रात्री 03.41 पासून सकाळी 06.48 पर्यंत असणरा आहे.
26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी महाकुंभ मेळ्याचं शेवटचं शाही स्नानदेखील करण्यात येणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)