Maha Kumbh 2025 : महाकुंभ मेळ्याचं शेवटचं शाही स्नान कधी होणार? वाचा 'या' दिवसाचं महत्त्व
मात्र, या कुंभमेळ्याचं शेवटचं स्नान कधी होणार आहे तुम्हाला माहीत आहे का?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाकुंभ मेळ्याचं भव्य धार्मिक आयोजन 13 जानेवारीला पौष पौर्णिमेच्या दिवशी सुरु झालं होतं. तर, या महाकुंभ मेळ्याची समाप्ती 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी होणार आहे. महाकुंभ मेळ्याच्या दिवशी प्रमुख तिथीनुसार स्नान करण्यात आलं.
महाकुंभ मेळ्यात पवित्र अशा त्रिवेणी संगमावर स्नान करण्याला धार्मिक महत्त्व आहे. मान्यतेनुसार, कुंभ मेळ्यात माघी स्नानाहून पवित्र असं कोणतं स्नान नाही. महाकुंभ मेळ्यात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. तसेच, पुण्य फळ मिळतं.
महाकुंभ मेळ्यात 13 जानेवारीला पौष पौर्णिमेच्या दिवशी पहिलं स्नान, दुसरं स्नान 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी, तिसरं स्नान 29 जानेवारीला मौनी अमावस्येला तर चौथं स्नान वसंत पंचमीला , पाचवं स्नान 12 फेब्रुवारीला माघी पौर्णिमेच्या दिवशी आणि शेवटचं स्नान 26 फेब्रुवारी ला महाशिवरात्रीच्या दिवशी होणार आहे.
महाकुंभ मेळ्यात पवित्र नद्यांच्या संगमात स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या काही पवित्र दिवशी स्नान केलं जातं. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शेवटचं स्नान होणार आहे.
तर, शाही स्नान तिसरं आणि शेवटचं हे वसंत पंचमीच्या दिवशी होणार आहे. पंचमी तिथी रविवारी, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 09 वाजून 15 मिनिटांनी लागणार आहे. तर, 3 फेब्रुवारीला सकाळी 07.01 ला समाप्त होणार आहे. त्यामुळे उद्य तिथीनुसार, 3 फेब्रुवारी रोजी महाकुंभ मेळ्याचं शेवटचं शाही स्नान होणार आहे.
महाकुंभ मेळ्यात स्नान करण्याचे काही नियमसुद्धा आहेत. याचं पालन करणं गरजेचं आहे. जसे की, महाकुंभ मेळ्यात संगमाच्या वेळी सर्वात आधी नागा साधू शाही स्नान करतात. त्यानंतर संसारी लोक स्नान करतात. स्नान करताना 5 वेळा पाण्यात डुबकी मारावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)