Janmashtami 2023: जन्माष्टमीला वास्तुदोषांपासून मिळेल मुक्ती, श्रीकृष्णासाठी घरात सजवा 'असा' देखावा, वास्तुशास्त्रात म्हटलंय...
यंदा कृष्णजन्माष्टमी 6 आणि 7 सप्टेंबर 2023 या दोन्ही दिवशी साजरी केली जात आहे. या दिवशी बाळकृष्णाच्या स्वागतासाठी भव्य देखावे साकारले जातात. तसेच तुम्ही घरच्या घरी देखील हा देखावा सजवू शकता, यामुळे वास्तू दोष देखील दूर होतील. काय म्हटलंय वास्तुशास्त्रात?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोराचे पंख नंदराजाच्या बाळकृष्णाचा जन्मदिवस, साजरा करण्यासाठी घरोघरी विविध प्रकारे देखावे साकारले जातात. शास्त्रानुसार जन्माष्टमीच्या देखाव्यात मोराची पिसे अवश्य ठेवावीत. यामुळे कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते. श्रीकृष्णाचा मुकुट आणि पालखीभोवती मोराची पिसे ठेवता येतील.
गाय आणि वासरू श्रीकृष्णाचे गायींवर खूप प्रेम आहे. अशा स्थितीत त्यांना प्रसन्न करण्यासाठी गाय-वासराच्या मूर्तीही देखाव्यात ठेवाव्यात.
बासरी जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या मूर्तीजवळ बासरी ठेवा. असे म्हटले जाते की, जे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरामध्ये देखावे साकारतात, त्यांचे चांगले दिवस लवकरच सुरू होतात. भाग्य उजळते, नशिबाचे दरवाजे उघडतात. या देखाव्यामध्ये बासरी ठेवल्याने घरात सुख-शांती नांदते आणि वास्तुदोष नष्ट होतात.
जन्माष्टमीच्या देखाव्याची योग्य दिशा घराच्या ईशान्य कोपऱ्यात श्रीकृष्णासाठी देखावा बनवा. यामुळे वास्तुदोषांपासून मुक्ती मिळते. कुटुंबात प्रेम वाढेल.
वैजयंती फुले श्रीकृष्णाला वैजयंतीची फुले खूप आवडतात. शास्त्रानुसार, वैजयंतीची फुले खूप भाग्यवान मानली जातात. जन्माष्टमीला देखावा सजवण्यासाठी वैजयंतीच्या फुलांचा वापर करा, श्रीकृष्णाला वैजयंती फुले अर्पण केल्यास पैशांची कमतरता भासत नाही असा विश्वास आहे. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)