Holi Celebration 2025 : महाड शहरात देव-दानवाच्या युद्धाची अनोखी परंपरा; दोन गटांत गरम निखारे फेकून केलं जातं युद्ध
गणेश म्हाप्रळकर
Updated at:
14 Mar 2025 09:22 AM (IST)

1
कोकणात शिमगा उत्सवाला सुरुवात झालेली आहे. या शिमग्यात कोकणात विविध ठिकाणी अनेक खेळ खेळले जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
असाच शिमगा कोकणात विविध प्रथा आणि वेगवेगळ्या परंपरेनुसार सुरू असतो.

3
त्यातीलच एक वेगळी परंपरा आणि वैशिष्ट्य म्हणजे महाडमधील देव-दानव युद्धाची ही अनोखी प्रथा.
4
होलिका दहन झाल्यानंतर महाडच्या गवळआळी येथे देव आणि दानव यांच्यात युद्ध खेळलं जातं.
5
रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये असणाऱ्या गवळीआळी येथे या प्रथेप्रमाणे होळी उत्सव सण साजरा केला जातो.
6
होळी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी देव-दानवाच्या युद्धाची परंपरा कायम आहे.
7
सर्व ग्रामस्थ होळीमधील जळती लाकडे एकमेकांच्या अंगावर फेकून ही युद्ध करतात.
8
ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून येथे सुरू आहे.