Garud Puran : मृत्यूच्या 1 तास आधी व्यक्तीला दिसतात 'हे' 5 संकेत; गरुड पुराणात म्हटलंय...
तर, गरुड पुराणानुसार, जेव्हा व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याच्या मृत्यूआधीच त्यांना काही संकेत मिळतात. हे संकेत नेमके कोणते ते जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामध्ये स्वर्ग, नरक, पाप, ज्ञान, नीति , नियम आणि धर्माच्या बाबतीत याचा उल्लेख करण्यात आला आहे.
कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू जेव्हा जवळ येतो तेव्हा त्याच्या हाताच्या रेषा एकदम हलक्या पडलेल्या दिसतात. तर, काही लोकांना या रेषाच दिसत नाहीत आणि त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी येते.
गरुड पुराणानुसार, ज्या व्यक्तीचा शेवटचा काळ येतो तेव्हा त्या व्यक्तीला यमराजाचे दूत दिसू लागतात. त्याचबरोबर एखादी नकारात्मक शक्ती आपल्या बरोबर आहे असा त्याला भास होतो.
गरुड पुराणानुसार, जेव्हा पण व्यक्तीची शेवटची वेळ येते तेव्हा त्याला जी व्यक्ती हयात नाहीत अशा व्यक्तींची सावली दिसते.
याचाच अर्थ व्यक्तीला त्यांचे पूर्वज दिसू लागतात. जणू काही ते आपल्या जवळ बोलवत आहेत असा भास होतो.
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आत्मा शरीरातून बाहेर येत असतो तेव्हा त्याला एक प्रकारचं रहस्यमयी दार दिसू लागतं. काही लोकांना त्यातून प्रकाशाची किरणं दिसतात. तर काहींना आगीचे लोळ दिसतात. त्याचबरोबर त्यांना त्यांची वाईट कर्म दिसू लागतात.
व्यक्तीचा शेवटचा क्षण जेव्हा जवळ येतो तेव्हा त्याला पाणी, आरसा आणि तूप किंवा तेलात स्वत:ची सावली दिसत नाही. असा उल्लेख गरुड पुराणात करण्यात आला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)