Shukra Gochar 2024 : शनीच्या राशीत होणार शुक्राचं आगमन; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींना सतर्कतेचा इशारा
गुरु ग्रह ऐश्वर्य, सौभाग्य, धन, प्रेम आणि वैभवाचा कारक शुक्र ग्रह वर्षाच्या शेवटी 28 डिसेंबर 2024 रोजी राशी परिवर्तन करणार आहे. शुक्र ग्रह एका राशीत 26 दिवसांपर्यंत स्थित असतात. त्यानंतर ते दुसऱ्या राशीत प्रवेश करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशुक्र ग्रह 28 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. शनी सध्या कुंभ राशीत स्थित आहे. यामुळे या राशीत शुक्राच्या आगमनाने कुंभ राशीत शुक्र-शनीची युती जुळून येणार आहे.
कुंभ राशीत जुळून येणाऱ्या शुक्र-शनीच्या युतीचा लाभ राही राशींच्या लोकांवर होणार आहे. तर काही राशींच्या लोकांना या काळात सावध राहण्याची गरज आहे. नवीन वर्षात शुक्र कोणत्या राशींचं संकट वाढवणार आहे ते जाणून घेऊयात.
कर्क रास - कर्क राशीत शुक्र ग्रह आठव्या चरणात असणार आहे. शुक्राच्या संक्रमणाने तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे या राशींची चिंता वाढेल. तसेच, तुमच्या आरोग्याच्या बाबतीत चिंता वाढू शकते. अशातच तुम्हाला जानेवारी 2025 पर्यंत सावधान राहण्याची गरज आहे.
कन्या रास - शुक्र ग्रहाचं कुंभ राशीत प्रवेश करताच कन्या राशींना सावधान राहण्याची गरज आहे. शुक्राचं संक्रमण सहाव्या चरणात आहे. या काळात तुम्हाला अपयश येण्याची शक्यता आहे.
मीन रास - गुरुची राशी म्हणजेच मीन राशीत शुक्र उच्च स्थानी आहे. शुक्र या राशीच्या 12 व्या स्थानी आहे. या दरम्यान तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा आहे. या काळात तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)