Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला बनतोय अद्भुत योग! 'या' राशींचे नशीब चमकणार
हिंदू दिनदर्शिकेनुसार, यंदा गणेश चतुर्थी 18 सप्टेंबर 2023 रोजी साजरी केली जाईल. चतुर्थी दुपारी 2:09 वाजता सुरू होईल आणि 19 सप्टेंबर रोजी दुपारी 3:13 पर्यंत संपेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावर्षी असे अनेक योगायोग आणि शुभ योग घडत आहेत, त्यामुळे गणेश चतुर्थीचा सण विशेष ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वर्षांनंतर गणेश चतुर्थीला एकत्र तीन शुभ योग तयार होणार आहेत. या दिवशी ब्रह्म योग, शुक्ल योग आणि शुभ योग असतील.
पंचांगानुसार यंदा गणेश चतुर्थीला विशेष योग तयार होणार आहे. त्यामुळे यंदाची गणेश चतुर्थी आणखी खास झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ही गणेश चतुर्थी काही राशींसाठी खूप खास आहे.
या गणेश चतुर्थीच्या दिवशी या तीन राशींवर गणपती बाप्पा कृपा करतील. चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळेल.
मेष- गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. वैयक्तिक जीवनात आनंद राहील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी वेळ अतिशय अनुकूल असणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला सिंदूर अर्पण करा.
मेष- गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. वैयक्तिक जीवनात आनंद राहील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी वेळ अतिशय अनुकूल असणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला शेंदूर अर्पण करा.
मकर- मकर राशीच्या लोकांना गणेश चतुर्थीच्या दिवसापासून मान-प्रतिष्ठा मिळेल. या दिवशी मंदिरात जाऊन गणेशाची पूजा करावी. मकर राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे स्रोत वाढतील. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित समस्या दीर्घकाळ दूर होतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.