Bail Pola : रंगीबेरंगी कवड्यांच्या माळा, घागर माळा... बैलपोळानिमित्त साजशृंगाराच्या साहित्याने बाजारपेठ सजली
माधव दिपके
Updated at:
12 Sep 2023 11:36 AM (IST)
1
बैलपोळा सण अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
येत्या गुरुवारी म्हणजे 14 सप्टेंबरला बैलपोळा साजरा होणार आहे.
3
वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी विविध प्रकारे सजविले जाते.
4
गळ्यात चंगाळे (घंटा) बांधल्या जातात. सुती धाग्यात विणलेल्या चंगाळ्यांवर लोकरी गोंडे गुंफलेले असतात.
5
त्यामुळे बैलांच्या सजावटीचे साहित्य हिंगोलीच्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे.
6
रंगीबेरंगी कवड्यांच्या माळा, घागर माळा त्याचबरोबर बैलांच्या सजावटीचे इतर साहित्य बाजारपेठेत विक्रीला आहे.
7
वर्षभर आपल्याला साथ देणाऱ्या बैलांच्या सजावटीसाठी शेतकरी सुद्धा उत्सुक असतात.
8
त्यामुळे बैलपोळ्यानिमित्त साजशृंगाराच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केलेली दिसत आहे