Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीच्या दिवशी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, काय करावे, काय करू नये? जाणून घ्या
गणेश चतुर्थीच्या दिवशी या गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या काय करावे, काय करू नये
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशुभ मुहूर्त - गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावरच बाप्पाची स्थापना करा. याद्वारे रिद्धी-सिद्धी प्राप्त होते. दुपारची वेळ पूजेसाठी उत्तम आहे. प्रतिष्ठापना झाल्यावर मूर्ती इकडे तिकडे हलवू नका.
योग्य दिशा- गणपतीची मूर्ती पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यातच बसवा. असे केल्याने बाप्पाचा 10 दिवस घरात वास असतो.
घरामध्ये स्थापनेचे नियम - जर तुम्ही घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करत असाल तर दररोज सकाळ संध्याकाळ त्यांना अर्पण करा आणि 10 दिवस आरती करा. मूर्तीजवळ अंधार होऊ देऊ नका. घर रिकामे ठेवू नका.
पूजेचे साहित्य- गणपतीला सिंदूर, दुर्वा आणि मोदक अर्पण करा, पण बाप्पाच्या पूजेत केतकीची फुले आणि तुळस वापरू नका. पूजेत शिळी किंवा सुकलेली फुले टाकू नका.
दिवसभरात या गोष्टी करू नका- गणेश उत्सवात मांसाहार किंवा मद्य सेवन करू नका. तामसिक आहारापासूनही दूर राहिले पाहिजे. गणेश चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांनी ब्रह्मचर्य पाळावे. शरीराबरोबर मनाची शुद्धता ठेवा, कोणाशीही शिवीगाळ करू नका, वाद घालू नका.
पूजेचे कपडे - गणेशपुत्र गौरीचे आवडते रंग लाल आणि पिवळे आहेत. या रंगांचे कपडे घालूनच पूजा करा. चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका. असे केल्यास 10 दिवसांची उपासना व्यर्थ जाईल
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)